आता औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेला खिंडार

0
175

– चार नगरसेवक शिंदे गटात, आणखी १२ नगरसेवकसुध्दा करणार जय महाराष्ट्र

औरंगाबाद, दि. २० (पीसीबी) – एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालाय. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. औरंगाबाद शिवसेनेचे 4 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळं आता औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय.

शिवसेनेचे 4 नगरसेवक नुकतेच शिंदे गटात दाखल आहेत, तर आणखी 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाठ, वर्षाराणी वाडकर आणि विकास जैन आदी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. 29 पैकी चार नगरसेवक उघडपणे शिंदे गटात दाखल असून येत्या काळात आणखी 10 ते 12 नगरसेवक फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळं शिवसेनेसाठी हा मोठा धक्काच म्हणावा लागेल