आण्णा भाऊंनी उपेक्षित लोकांचे साहित्य निर्माण केले – सतीश काळे

0
223

– संभाजी ब्रिगेडतर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन.

पिंपरी दि. १ (पीसीबी) -समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या शुरवीरांच्या कथा आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समोर आणल्या. कष्टकऱ्यांचे साहित्य निर्माण केले. जे खऱ्या अर्थाने उपेक्षित होते, आशा उपेक्षित लोकांचे सुंदर साहित्य निर्माण करण्याचे काम आण्णा भाऊ साठे यांनी केले असल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. निगडी भक्ती शक्ती येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे, सचिव संजय जाधव, उपाध्यक्ष विनोद घोडके, संघटक बाळासाहेब वाघमारे, सतिश कदम, लहू अनारसे, नवनाथ गायकवाड, दिपक जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.