आंबी येथे दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई

0
97

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबी येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड म्हणून शाखेच्या युनिट 5 ने छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास करण्यात आली.

जसवंत राहुल राठोड (वय 20, रा. आंबी, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार भरत माने यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जसवंत याने आंबी येथे ओढ्याच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये एक लाख तीन हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर रसायन पोलिसांनी नष्ट केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.