(अ) क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत स्मार्ट सिटी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित होणार

0
203

पिंपरी दि. १४ (पीसीबी) : -पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटर हा प्रकल्प उभारण्यात आलेला असून सदर प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटर (ICCC) चे माध्‍यमातून अ क्षेत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात येणारे स्मार्ट सिटी प्रकल्प सोमवार, दि. १५ ऑगस्ट रोजी प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली

आयसीटीच्या पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिक केंद्री सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले या सर्वांचा समावेश आहे.तसेच या पायाभूत सुविधांमध्ये ऑप्टीकल फायबर, वाय फाय, वायर्ड बस, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, ५ जी पर्यंतची कनेक्टीव्हिटी बँडविड्थ आणि लॉंग टर्म इव्होल्युशन नेटवर्क यांचा समावेश करण्यात आला आहे.

सदर प्रकल्पांची नागरिकांना माहिती होण्यासाठी रविवारी, निगडी येथील कंट्रोल अँड कमांड सेंटर येथे पत्रकार परिदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता संजय खाबडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, टेक महिंद्रा कंपनीचे नितीन बियाणी, मनोज कांबळी, चंद्रकांत देशपांडे, एल अँड टीचे गिरीष सुराडकर आणि सल्लागार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटर (ICCC ) मार्फत अ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणारे स्मार्ट सिटी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरच्या माध्यमातून अ क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, ८ पीए सिस्टीम, ८ व्हीएमडी, ६ किऑस्क्स, १५० ठिकाणी २९२ सीसीटीव्ही, ३३ वायफाय, ४ पर्यावरण सेन्सर्स, २ एटीसीएस, २ एसटीपी, १ डब्ल्यूपीएस, २६ घनकचरा वाहने, १ पार्किंग, १७०० वॉटर मीटर इ. प्रकल्प प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण प्रकल्प शहरामध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. एल अँड टी आणि टेक महिंद्रा या दोन्ही कंपन्यांद्वारे स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांचे कामकाज सूरू आहे.

कमांड आणि कंट्रोल सेंटर हे आपत्तींचे व्यवस्थापन, विसंगत परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी आणि शहरातील विविध ऑपरेशन साठीचे नियंत्रण केंद्र मानले जाते. इंटीग्रेटेड स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या सहाय्याने स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहनतळ व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट समुदायांचे व्यवस्थापन, स्मार्ट महापालिका व्यवस्थापन, स्मार्ट परिवहन व्यवस्थापन इत्यादी स्मार्ट सिटी संबंधित घटकांशी संपर्क स्थापित करणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे. या सर्व बाबी एकत्रित करून सिटी ऑपरेशन सेंटरची रचना अस्तित्वात आली आहे. त्याद्वारे संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जाणार आहे.

डॅशबोर्डच्या माध्यमातून आयसीसीसीमधील प्रत्येक घटकाचे लाईव्ह स्थिती समजण्यात मदत होणार आहे. याचबरोबर, ऑटोमेशन आणि मनुष्यबळाद्वारे केली जाणारी कामे आणि प्रक्रिया नियंत्रित करणे, विविध संस्थांबरोबर एकत्र काम करणे, समस्या शोधणे व त्यांचे निराकरण करणे, माहितीचे रिअल टाईम विश्लेषण आणि भविष्यवेधी बौद्धिक कौशल्य, जनजागृती आणि प्रतिसाद या कार्यपद्धतीद्वारे लोकांचा सहभाग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन, शासकीय व्यवस्थेपर्यंत सुलभतेने पोहोचता येणे, योग्य वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, शहराच्या आरोग्याशी संबंधित परिस्थितीचे यथायोग्य विश्लेषण आणि देखरेख, सुरक्षितता आणि कायद्याच्या