अविनाश भोसलेंचे आजारपण खरे की खोटे

0
299

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील सुप्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले सीबीआय कोठडीत आहेत. अविनाश भोसले यांची ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आरोग्य तपासणी करण्यात आली होती. सीबीआयने मुंबईच्या विशेष न्यायालयात ही विनंती केली होती.

अविनाश भोसले यांना सीबीआयने गेल्या वर्षी २६ मे रोजी अटक केली होती आणि नंतर त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतले होते. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून, ऑक्टोबरपासून रुग्णालयात दाखल आहेत.

अविनाश भोसले यांची नवी दिल्लीतील एम्समधील वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता सीबीआयने शुक्रवारी भोसले यांच्या प्रकृतीवर शंका उपस्थित केली. भोसले यांची लष्करी किंवा नौदलाच्या रुग्णालयातून वैद्यकीय फेरतपासणी करावी का, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का, याबाबत सवाल उपस्थित केला.