अल्पवयीन मुलीसोबत ६५ वर्षीय व्यक्तीचे गैरवर्तन

0
308

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – अल्पवयीन मुलगी गार्डन मधील बाकावर बसली असताना तिथे रेंगाळणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीने मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. १८) सकाळी पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार असद मुनीर खान (वय ६५, रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी घराजवळ असलेल्या गार्डन मधील बाकावर बसली होती. त्यावेळी तिथे आरोपी आला. मात्र फिर्यादी यांच्या मुलीसोबत एक महिला असल्याचे पाहून तो तिथून निघून गेला. काही वेळाने तो परत आला. त्याने मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. पीडित मुलगी तिच्या नातेवाईकांकडे गेली असता तिथेही आरोपी पाठलाग करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.