अमिताभ बच्चन यांच्या मराठीतून प्रशांत दामलेंना शुभेच्छा

0
251

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : मराठी कला विश्वात सिनेमा आणि नाटक याप्रकारांमध्ये गेली ३९ वर्षे कार्यरत असणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांच्या १२५०० व्या नाट्य प्रयोगाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह विविध कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामले यांनी त्याच्या कारकिर्दीतील १२५०० वा प्रयोग मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात सादर केला. प्रशांत दामले यांना भारतीय सिनेमाचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांना खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन काय म्हणाले ?
प्रशांत दामले यांचा १२५०० प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. ३९ वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी ‘एका लग्नाची गोष्ट’ या १००० व्या प्रयोगाला गेलो होतो. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!,असं अमिताभ बच्चन म्हणाले.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांच्या १२५०० व्या नाट्य प्रयोगाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना जुनी आठवण सांगितली. तुमच्या एका लग्नाची गोष्ट या नाटकाच्या १००० व्या प्रयोगाला मी उपस्थित होतो, असं ते म्हणाले. आजच्या तुमच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला उपस्थित नसलो तर मी मनाने तिथेच तुमच्याबरोबरचं आहे, असं अमिताभ बच्चन म्हणाले.