अफिम विक्री प्रकरणी एकास अटक

0
385

थेरगाव, दि. २८ (पीसीबी) – राजस्थान येथून मागवून अफिमची विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या राजस्थान येथील साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) रात्री थेरगाव येथे करण्यात आली.

प्रकाश रामेश्वर आहिर (वय 22, रा. काळेवाडी. मूळ रा. राजस्थान) याला अटक केली आहे. त्याच्यासह रामेश्वर शंकर अहीर (रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील एका भेळच्या दुकानात एकजण अफिम विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून प्रकाश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख 52 हजार 400 रुपयांचे 631 ग्राम अफिम, 10 हजारांचा एक मोबाईल फोन जप्त केला आहे. त्याला हे अफिम विक्रीसाठी त्यांचा राजस्थान येथील साथीदार रामेश्वर याने ट्रकने पाठवले असल्याचे समोर आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.