अन् रोखठोक अजितदादा पवार !

0
472

मुंबई,दि. १७ (पीसीबी) – “पुस्तकाच्या कव्हरचा रंग काळा का?”,असा सवाल महाराष्ट्राचे “रोखठोक” नेते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पुस्तकाचे लेखक राजा माने यांना केला आणि माने बुचकळ्यात पडले! मुद्रण सौंदर्य आणि सुबकतेच्या निकषांचा आधार घेत अजितदादांचे समाधान होईल असे प उत्तर त्यांना द्यावे लागले.पण त्या नंतर त्यांनी आस्थेवाईकपणे पुस्तक चाळले आणि पुस्तकाचे कौतुकही केले.विधान भवनातील त्यांच्या दालनात आज माझे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक व चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्राची फ्रेम त्यांना माने व दादांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते भेट देण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या ७५मान्यवरांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक राजा माने यांनी लिहिले आहे.त्या व्यक्तिमत्त्वांत अजितदादांचाही समावेश आहे. पुस्तकात समाविष्ट व्यक्तिमत्त्वांची व्यक्तीचित्रे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटली आहेत.पुस्तक व त्यांच्या रेखाचित्राची फ्रेम त्यांना भेट देण्यात आली.यावेळी तरुण उद्योजक अमोल पाटील, वकील अतुल पाटील आणि कुंदन हुलावळे हे उपस्थित होते.