झारखंडमधील दुमका येथे सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश ट्रॅव्हल ब्लॉगरने भारताची बाजू घेतली आहे. महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर अनेक लोक भारताविरुद्ध बोलत आहेत. अशा परिस्थितीत पीडितेने स्वतः पुढे येऊन अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. भारत हा एक महान देश असल्याचे सांगताना त्या पिडीत महिलेने म्हटले की, भारत देशाविषयी बोलणे बंद करा कारण जगातील प्रत्येक देशात अशा घटना घडतात.
या महिलेने सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘स्पेन असो, ब्राझील, अमेरिका किंवा इतर कोणताही देश, जगातील प्रत्येक देशात अशा घटना घडतात. आम्ही भारतात होतो म्हणून असं झालं म्हणणं बंद करा. सोमवारी मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी पीडितेची भेट घेऊन तिचा जबाब नोंदवला. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरितांच्या शोध सुरू आहे.