अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील – ज्ञानेश्वर लांडगे

0
296

– प्रचाराचा धडाका, सभासदांचा मोठा प्रतिसाद

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकीतील अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. पॅनेलच्या प्रचारसभांना सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उत्स्फुर्तपणे सभासद सभेला हजेरी लावत असून पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास पॅनेल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.

पिंपरीगावातील गंधर्व हॉलमध्ये झालेल्या या सभेला पॅनेल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे, प्रचार प्रमुख संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे, माजी नगरसेवक अमित गावडे, शत्रुघ्न काटे, संदीप वाघेरे, माजी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघेरे, संतोष कुदळे, श्रीराम कोकणे ,नारायण काटे, अण्णा कापसे यांच्यासह उमेदवार आदी उपस्थित होते.

पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, पवना बँकेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. बँकेची 50 वर्षाकडे यशस्वी वाटचाल सुरु आहे. सर्वांच्या सहकार्याने बँकेचे कामकाज उत्तम सुरु आहे. पवना बँकेचे सभासद सुज्ञ आहेत. त्यामुळे निवडणुकीची आम्हाला चिंता नाही. इतके वर्ष सभासदांनी बँकेचे नेतृत्व योग्य लोकांच्या हाती दिले. त्याचप्रमाणे यावेळीही योग्य लोकांच्या हाती बँकेचे नेतृत्व देतील याची मला खात्री आहे.

अण्णासाहेब मगर सहकार पॅनल सर्वसमावेशक आहे. सर्व घटकातील लोकांना संधी दिली आहे. पॅनेलमधील उमेदवार निष्कलंक, सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि व्यावसायिक आहेत. त्यामुळे पॅनेलमधील उमेदवारांच्या कपबशी चिन्हावर शिक्का मारुन सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. जास्तीत-जास्त सभासदांपर्यंत पोहचावे. त्यांना बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती व्हावी यासाठी विभागनिहाय सभा घेतल्या जात आहेत. त्याला सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वसाही लांडगे यांनी व्यक्त केला.

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधील उमेदवार

सर्वसाधारण गट-
(17)लांडगे ज्ञानेश्वर पांडुरंग
(03)काळभोर विठ्ठल सोमजी
(06)गराडे शांताराम दगडू
(01)काटे जयनाथ नारायण
(14)फुगे शामराव हिरामण
(18)वाघेरे शिवानी हरिभाऊ
(04)काळभोर शरद दिगंबर
(16)लांडगे जितेंद्र मुरलीधर
(08)गावडे अमित राजेंद्र
(10)चिंचवडे सचिन बाजीराव
(05)काळभोर सचिन ज्ञानेश्वर
(09)गावडे चेतन बाळासाहेब
(07)गव्हाणे सुनील शंकर
(13)नाणेकर विपीन निवृत्ती
महिला राखीव गट-
(03)गावडे जयश्री वसंत
(02)काळभोर ऊर्मिला तुळशीराम
अनुसूचित जाती / जमाती गट-
(02)डोळस दादू लक्ष्मण