अजित पवार यांना भाजप घाबरली – संतोष निसर्गंध

0
539

पिंपरी – देहु येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिले नाही,या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झोपडपट्टी सेलचे शहराध्यक्ष मा.संतोष निसर्गंध यांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.

राष्ट्रसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ( दि.१४ ) संपन्न झाला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे उपस्थीत होते,मात्र अजित पवार हे आपण केलेली विकास कामे पंतप्रधान मोदी व जनतेसमोर सांगून भाजपला उघडे- नागडे करणार या भितीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस घाबरून गेले होते, या मुळेच मा.अजित पवार,यांना बोलू दिले नाही.हा सबंध महाराष्ट्राचा अवमान आहे, हा अवमान आम्ही सहन करणार नाही.आगामी काळात आम्ही भाजपला पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांमधून हद्दपार करूनच या या घटनेचा वचपा काढण्याचा निर्धार झोपडपट्टी सेलचे शहर अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी केला आहे.