“अजित दादा तुम्ही शिव-शाहू – फुले आंबेडकर यांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला- डॉ.अमोल कोल्हे यांची जोरदार टीका

0
108

शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.अमोल कोल्हे यांनी खोटा इतिहास सांगितल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर शिरूरच्या जाहीर सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले. अजित दादा तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला नसेल. म्हणूनच तुम्ही आरोप करताय मी खोटा इतिहास दाखवला. पण पुरोगामी विचार हा कायम व्यवस्थेला प्रश्न विचारत आला आहे. हे प्रश्न विचारले म्हणूनच छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मला जनतेसमोर मांडता आला. पण तुम्ही जो आरोप केला त्यामुळे शिव-शाहू – फुले आंबेडकर यांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर मध्ये जेष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाच कंदील चौकात पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, आमदार अशोकबापू पवार, आ. रोहित पवार, उत्तमराव जानकर, नितेश कराळे, सुजताभाभी पवार, काकासाहेब पलांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर आदी उपस्थित होते.

बारामतीची निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात तळ ठोकलाय. यावेळी जाहीर सभांमध्ये अजित पवार हे डॉ. कोल्हे यांच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. या टिकेला डॉ. कोल्हे यांनी जाहीर सभेतून चोख प्रत्युत्तर दिल.

डॉ. कोल्हे म्हणाले की, योद्धा शरण जात नाही, म्हणून त्याला बदनाम केलं जातं. बारामतीतुन काही पाव्हणे आलेत, बारा बारा सभा घेतायेत, आता कळल त्यांचे प्रदेशाध्यक्ष येतायेत. एका शेतकऱ्यांच्या पोराला पाडायला सगळे राष्ट्रीय नेते एकत्र आलेत. अजित पवारांविषयी माझ्या मनात आस्था आहे, पण 27 जून 2023 पूर्वीच्या अजित पवारांविषयी आस्था आहे. 27 जूनला भोपाळ मध्ये पंतप्रधानांच भाषण झालं त्यानंतर त्यांचा कढीपत्ता कसा झाला. बारामतीच मतदान झालं, उमेदवार निवडून येत नाही असं दिसलं, लगेच शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भातली याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली मी आत्तापर्यत ऐकलं होतं, कार्यकर्त्यांच्या मनात भावना असते कढीपत्ता होण्याची इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत पण भाजप तेच करतोय का हा प्रश्न पडतोय.