अंधेरी पूर्व च्या पोटनिवडणुकिला शिवसेनेचे चिन्ह कोणते ?

0
337

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. अंधेरीची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी होईल् असे वाटले होते. मात्र, ही जागा शिंदे गटाकडून भाजपने घेतली आहे. यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना इथे पाहायला मिळणार आहे.

अंधरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. मात्र गेली अनेक दिवस सुरू असलेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. यामुळे आता निवडणुकीपूर्वी धनुष्यबाणावर सुनावणी पूर्ण होणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. निवडणूक जाहीर झाली असली तरी नेमके निवडणूक चिन्ह काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंधेरी पूर्व मतदारसंघ हा शिवसेनेचा आमदार असलेला मतदारसंघ असल्याने येथून शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक लढवेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, भाजपने शिंदे गटाच्या मतदारसंघात जात आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे संभाव्य उमेदवार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ​​​​​​