होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, वारंवार दुर्घटना घडूनही सरकार झोपेत

0
114

राज्यात हर्डिंग दुर्घटनेचे आजवर अनेक प्रकार होऊनही सरकारी पातळीवर गांभीर्याने पावले उचलली जात नाहीत. सोमवारी राज्यात निवडणूक धामधुम सुरू असतानाच तिकडे मुंबईत बेकायदा होर्डिंग कोसळून १४ ठार आणि ७४ नागरिक जखमी झाले. यापूर्वी पुणे शहरात मालधक्का चौकात दोघांचा, गतवर्षी पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथे पाच नागरिकांचा, मोशी येथे दोघांचा मृत्यू बेकायदा होर्डिंग कोसळून झाला. राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका-नगरपालिका याबाबत तितक्या गांभी्र्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात भलं मोठ नुकसान झालं असून, काही भागात जीवित हानी देखील झाली आहे. मुंबईतही सोमवारी 13 मे च्या सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लाववल्याने, यावेळी घाटकोपर परिसरात एक मोठी दुर्घटना घटना घडली आहे. तुफान सुटलेल्या वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळले. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.! तर 74 हून अधिक जण जखमी झाले. 15 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या होर्डिंगचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदले गेले असले तरी आता हे होर्डिंग महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुळे घाटकोपर येथे पूर्व द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर उभा करण्यात आलेला महाकाय जाहिरात फलक कोसळला. त्याखाली शेकडो नागरिक अडकले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ झाली आहे.

कोसळलेला फलक अनधिकृत असल्याचे समोर आले असून, पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा जाहिरात फलक मालकावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी चारच्या सुमारास हा फलक पेट्रोल पंपावर कोसळला, त्यावेळी तेथे शंभरपेक्षा अधिक नागरिक आडोशाला उभे होते. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून, ७४ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही फलक पूर्णपणे हटवण्यात यश आले नसून एनडीआरएफ, अग्निशमन आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरू आहे. अद्यापही फलकाखाली काहीजण अडकल्याची भिती आहे. त्यानुसार अडकलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. हा जाहिरात फलक बाजूला करण्यासाठी काल रात्री तेथे मोठ्या क्रेन आणण्यात आल्या आहेत.

सोमवारी सायंकाळी मुंबईतील वातावरणात अचानक बदल झाला आणि काळेकुट्ट ढग दाटून आल्यानंतर धुळीचे वादळ आणि पाऊस सुरू झाला. या वादळामुळे घाटकोपरच्या समता कॉलनीतील रेल्वे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग पडले, त्याखाली मोठ्या प्रमाणात लोक अडकले असल्याची माहिती सुरूवातीला सांगण्यात आली. घटनास्थळी आरडाओरडा झाला. तत्काळ पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत.