‘हेल्थ ऑफ नेशन’ अहवालानुसार भारत बनला ‘कर्करोगाची राजधानी’

0
161

अपोलो हॉस्पिटल्सने ‘हेल्थ ऑफ नेशन’ च्या प्रमुख वार्षिक अहवालाच्या नवीनतम आवृत्तीचे नुकतेच अनावरण केले. अहवालात कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसह भारतातील असंसर्गजन्य रोग (एचसीडी) च्या वाढीवर प्रकाश टाकला आहे, या सर्वांचा देशाच्या एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. विशेषत: जगाच्या तुलनेत भारतातील कर्करोगाच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब आहे, ज्यामुळे भारत ‘जगातील कर्करोगाची राजधानी’ झाला आहे.

डॉ. प्रीथा रेड्डी, उपाध्यक्षा, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाल्या की,“आपल्या देशाच्या विकासात आरोग्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमच्या हेल्थ ऑफ नेशन अहवालाद्वारे, आम्ही असंसर्गजन्य रोगांच्या सतत वाढणाऱ्या ओझ्याकडे लक्ष वेधण्याचा आणि जागरुकता आणण्याची आशा करतो. तसेच आमचा असा ठाम विश्वास आहे की संपूर्ण आरोग्यसेवा इकोसिस्टीम आणि राष्ट्राने एकत्र येण्याची आणि एकसंध दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून आपण एनसीडीचा खऱ्या अर्थाने सामना करू शकू. आमच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या वाढत्या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि ते पलटवून लावण्यासाठी तत्काळ उपचारांची खूप गरज आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देऊन, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपायांना चालना देऊन आणि आरोग्यातील असमानता दूर करून शाश्वत विकासाचा मार्ग देखील मोकळा करू शकतो.”