हिंजवडी परिसरात सव्वापाच लाखांच्या दागिन्यांची चोरी

87

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – हिंजवडी येथे एका घरातून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख २१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना ५ जून २०२२ पूर्वी सहा महिन्यांपासून घडली.

तरुजा भारत भोसले (वय ६३, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने पाच लाख २१ हजारणाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यात ९६ हजारांच्या अँटिक सोन्याच्या दोन बांगड्या, ३० हजारांचे नेकलेस, ७५ हजार ४०० रुपयांचे कानातील टॉप्स, एक लाख रुपयांच्या चार बांगड्या, एक लाख सहा हजार रुपयांचे अँटिक नेकलेस आणि टॉप्स, एक लाख १४ हजारांचे केडियमचे नेकलेस आणि टॉप्स असे दागिने चोरीला गेले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.