हिंगोली जिल्ह्यात पहाटे 5 वाजता भूकंपाचे धक्के

0
141

हिंगोली, दि. २० (पीसीबी) – एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार राज्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जिथे आज (सोमवार) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी एनसीएसनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. सद्य:स्थितीत यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पहाटे 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किलोमीटर आत होते. NCS ने प्लॅटफॉर्म X वर भूकंपाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

जपानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले –
GFZ जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसने सांगितले की, रविवारी जपानच्या होन्शुच्या दक्षिण-पूर्व भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी मोजण्यात आली आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, 0635 GMT वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू 30.71 अंश उत्तर अक्षांश आणि 142.10 अंश पूर्व रेखांशावर होता. त्याची खोली 10.0 किमी होती. मात्र, कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.