हातचालाखीने एटीएम कार्डची आदलाबदल करत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

36

चिंचवड, दि.९ (पीसीबी) – हात चालखीने 61 वर्षीय नागरिकाचे एटीएम कार्ड ची अदलाबदल केली व त्यांची फसवणूक केली. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.8) चिंचवड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये घडली आहे.

यावरून सुरेश वसंतराव सुर्यवंशी (वय 61 रा. वाल्हेकरवाडी,चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी पैसे काढण्यासाठी तेथे असलेल्या अज्ञात इसमाला मदत मागितली. यावेळी त्या इसमाने हातचालाखीने फिर्यादी यांचे एटीएम कार्ड आदलाबदली केले. तसेच फिर्यादीला कैलास जाधव नावाचे भलतेच कार्ड देत फिर्यादीच्या खात्यातून परस्पर 40 हजार रुपये काढून घेतले. यावरून चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.