हाउसिंग सोसायटीच्या पाणी टाकीत पडून बालकाचा अंत

0
1627

मोशी, दि. २९ (पीसीबी) – गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना हाउसिंग सोसायटीच्या पाणी टाकीत पडून एका बालकाचा अंत झाला.मोशी येथील मंत्रा सोसायटीमध्ये काल रात्री ही दुःखद घटना घडली.बाप्पांची विसर्जन मिरवणूक चालू असतानाच आरव आशिष पाटील हा पाच वर्षाचा बालक पाण्याच्या टाकीत पडला.तो सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याचे कोणाच्याही लक्षात. आले नाही. सर्वजण विसर्जन मिरवनुकित दंग होते त्याच वेळी तो पाण्याच्या टाकीत पडला होता. हा प्रकार कुणालाही माहीत नव्हता. एक तासानंतर त्याचे आई-वडील शोधत असताना त्यांना तो सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसला. त्यानंतर त्याल टाकीतून बाहेर काढण्यात आले पण तोवर खूप उशीर झाला होता.