हरिदास नायर यांच्या जन्म तिथी निमित्त गरीब 21 महिलांना धान्याचे किट

0
36

पिंपरी,
दि. 15 (पीसीबी)

पुणे लायन क्लब निगडी कार्यालयात स्वर्गीय हरिदास नायर यांच्या जन्म तिथी निमित्त घरकाम करणाऱ्या व आर्थिक दुर्बल 21 महिलांना धान्याचे किट वाटण्यात आले
या कार्यक्रमासाठी लायन चंद्रशेखर पवार यांनी पुढाकार घेतला हा कार्यक्रम क्लब च्या अध्यक्षा लायन सौ मनीषा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला
सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय हरिदास नायर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व श्रद्धांजली वाहून करण्यात करण्यात आली
या सेवाभावी कार्यक्रमास लायन रश्मी नायर, वृषाली सुरवडे ,भाग्यश्री पवार, सलीम शिकलगार, प्रशांत कुलकर्णी ,हर्ष नायर, शितल पवार मनोज देशमुख ,रामकृष्ण मंत्री , जयश्री मांडे,नसीम शिकलगार ,शिवकन्या मुसमाडे यांची उपस्थिती होती.