स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूपदी डॉ. मनोहर चासकर

0
73

सांगवी, दि.२२ (पीसीबी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. मनोहर चासकर यांची नियुक्ती झाली. डॉ. चासकर हे मूळचे आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ या गावाचे आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून रसायनशास्त्र विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवली असून त्यानंतर जपान येथून पोस्ट डॉक्टरेट केले. तेथे अनेक वर्ष ते व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून कार्य करत होते. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विज्ञान व तंत्र ज्ञान विभागाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते तसेच विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे पण ते सदस्य होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या. आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे ते प्राचार्य देखील होते. एकूण पस्तीस वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा आणि संशोधनाचा अनुभव आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले.

अतिशय अभ्यासू हुशार आणि संशोधन प्रवीण अशा डॉ. मनोहर चासकर यांची कुलगुरू पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत जी सपकाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. सांगवी येथील डॉ.चासकर हे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. युवा नेते प्रशांत सपकाळ यांनी त विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांचे अभिनंदन केले. डॉ.चासकर यांच्या कुलगुरू म्हणून झालेल्या नियुक्तीने शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी दिपक लांघी, अनिकेत लांडगे, प्रसाद मुंढे, प्रथमेश भांबरे, हर्षल ननावरे, गणेश उपस्थित होते.