स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहर काँग्रेसची आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात

215

मुंबई, दि. १० (पीसीबी) – भारत देशाच्या यावर्षीचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे. याचे औचित्य साधून क्रांती दिनाच्या दिवशी मंगळवारी दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पिंपरी विधानसभा मतदार संघातील पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी येथील शहिद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आझादी गौरव पदयात्रेस सुरवात करण्यात आली. यावेळी दापोडी परिसर, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात ही यात्रा काढण्यात आली. तसेच सायंकाळी ५ वाजता पिंपरीगाव, मिलिंद नगर, पिंपरी कॅम्प, भाटनगर या परिसरात ही यात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्येष्ठ नेते तानाजी काटे, अशोक मोरे, माजी नगरसेविका निगार बारस्कर, माजी नगरसेवक बाबू नायर, महिला अध्यक्ष सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवादल अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआय महा. प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उमेश खंदारे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहीतुले, डॉ. मनीषा गरुड, छायाताई देसले, स्वाती शिंदे, आशा भोसले, अनिता अधिकारी, उषा साळवी, सुप्रिया पोहरे, वैशाली शिंदे, शोभा पगारे, राधिका अडागळे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, महानंदा कसबे, चक्रधर शेळके, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, चंद्रकांत काटे, इस्माईल संगम, लक्ष्मण रुपनर, बाबा बनसोडे, किरण खाजेकर, मेहबूब शेख, रवी कांबळे, पांडुरंग जगताप, उमेश बनसोडे, सौरभ शिंदे, स्वप्नील बनसोडे, किरण नढे, विशाल सरवदे, मिलिंद फडतरे, झुबेर खान, विजय ओव्हाळ, आबा खराडे, हरीश डोळस, राहुल ओव्हाळ, रोहित भाट, आण्णा कसबे, नितीन खोजेकर, गौतम ओव्हाळ, सतीश भोसले, संदीप शिंदे, आकाश शिंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.