स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर बापाने केला बलात्कार

126

काळेवाडी, दि. २३ (पीसीबी) – नराधम बापाने पोटच्या १४ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत घरात कोणालाही न सांगण्याची मुलीला धमकी दिली. ही धक्कादायक घटना काळेवाडी आणि हिंजवडी परिसरात ऑगस्ट २०२० ते २० जून २०२२ या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या ३२ वर्षीय आईने मंगळवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३४ वर्षीय नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी बापाचा हात झटकून घरातून बाहेर जात असताना आरोपी बापाने मुलीचे तोंड दाबून तिला घरात बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ”तू जर घरामध्ये कोणाला काहीही सांगितले तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन” अशी धमकी दिली. पीडित मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला. २० जून रोजी सकाळी साडेसात वाजता आरोपी पुन्हा मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. आरोपी सध्या फरार आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.