सोसायटी समोर पार्क केलेली कार चोरीला

53

चिखली ,दि.२२(पीसीबी) – सोसायटी समोर पार्क केलेली कार अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी सहा वाजता ग्रीन्स पार्क हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली येथे घडली.

राम पोपट क्षीरसागर (वय ४३, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची चार लाख रुपये किमतीची कार (एमएच १७/सीएम १०८०) शनिवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या सोसायटीच्या समोर पार्क केली. तिथून अज्ञातांनी रात्रीच्या वेळी कार चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.