सोसायटीच्या पार्किंग मधून कार चोरीला

0
50

भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) -सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली कार चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 4) रात्री कृष्णा हेरीटेज सोसायटी, एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली.प्रवीण प्रभाकरराव लोखंडे (वय 44, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची तीन लाख रुपये किमतीची कार (एमएच 14/जीएस 6023) सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली. शनिवारी (दि. 3) सायंकाळी साडेचार ते रविवारी रात्री दहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने कार चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.