सोशल मीडिया फाऊंडेशन व जाज्वल्य वृत्तवाहिनीचे संपादक किशोरभाई भंडारी यांच्या वतीने पुरस्काराचे वितरण

0
214

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – श्री नितीनजी बेदमुथा हे अत्यंत कर्मठ, कर्तृत्ववान, धाडसी आणि स्पष्टवक्ते म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये ओळखले जातात. श्री अखिल भारतीय कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय जैन कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांनी कॉन्फरन्सच्या कार्यात प्रशंसनीय योगदान दिले आहे. ते पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष होते अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून नितीनजी धार्मिक, सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

दक्षिण चंद्रिका मधुर व्याख्यानी प.पू. डॉ. संयमलताजी म. सा. आदि साध्वीजी यांचा अध्यात्मिक दृष्ट्या ऐतिहासिक चातुर्मास त्यांच्या नेतृत्वाखाली भव्य आणि दिव्य पद्धतीने संपन्न होत आहे. सोशल मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्षकिशोर भाई भंडारी यांचे आभार मानतो की त्यांनी माझी निवड या पुरस्कारासाठी केली आणि समाजासाठी समर्पित अशा कार्यकर्त्याचा “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करनार आहेत. कार्यक्रमास सोशल मीडिया फाउंडेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अखिल बंसल जयपुर, डॉ. विनोदकुमार जैन राष्ट्रीय महासचिव मालेगाव आणि पिंपरी चिंचवड सह राज्यातील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जाज्वल्य न्यूजचे संस्थापक श्रीपाल भंडारी यांनी दिली.