दि . ६ ( पीसीबी ) – सॉरी! माझी जगायची इच्छा संपली असे म्हणत हिंजवडीमध्ये IT इंजिनिअरने तरूणीने आयुष्य संपवले. २५ वर्षीय तरूणीने पहाटे २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ३१ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव अभिलाषा असं आहे. नैराश्यातून अभिलाषाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…. अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणी अभिलाषा हिने आत्महत्या केली. ३१ मे रोजी पहाटे साडेचार वाजता अभिलाषा हिने २१ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे या २५ वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे 4 :30 सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर तिने लिफ्टने २१ व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे ४. ४२ सुमारास आत्महत्या केली . अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याच नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली. या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे सांगितल आहे . प्राथमिक दृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेल एक सुसाइट नोट सापडली आहे , त्यावर सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…. असं लिहिलेलं आढळून आल आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.