सील केलेल्या फ्लॅटमध्ये अतिक्रमण

0
353

वाकड, दि. ८ (पीसीबी) – तहसील कार्यालयाकडून चार फ्लॅट सील करून त्यांचा ताबा फायनान्स कंपनीकडे देण्यात आला. असे असताना एका व्यक्तीने सील तोडून फ्लॅटमध्ये अतिक्रमण केले. ही घटना सात फेब्रुवारी रोजी सकाळी कस्पटे वस्ती वाकड येथे उघडकीस आली.

चांदसाहब हुसेन शेख (वय 60, रा. कस्पटे वस्ती, वाकड) आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष कांतीलाल शिंदे (वय 42, रा. स्वारगेट) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे इंडोस्टार फायनान्स या कंपनीत काम करतात. आरोपी शेख यांनी फ्लॅटसाठी फिर्यादी यांच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार मुळशीचे निवासी नायब तहसीलदार यांनी सदर चार फ्लॅट सील केले. त्यानंतर आरोपींनी सील केलेल्या फ्लॅटचे सील आणि कुलूप तोडून फ्लॅटमध्ये अतिक्रमण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.