सावत्र आईचा विनयभंग; मुलाला अटक

172

चाकण, दि. २८ (पीसीबी) – सावत्र आईचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. विनयभंगाची ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी खेड तालुक्यातील पाईट येथे घडली.

पिडीत महिलेने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 45 वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरात पिशवीत गहू भरत होत्या. त्यावेळी तिथे त्यांचा सावत्र मुलगा आरोपी आला. त्याने घराचा दरवाजा बंद करून फिर्यादिसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्यांनतर फिर्यादीच्या पर्समधून रोख रक्कम, दागिने असा 35 हजारांचा ऐवज काढून घेतला आणि पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.