दि . २७ ( पीसीबी ) – हरियाणाच्या पंचकूलामध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्येच टोकाचं पाऊल उचललं. कारमध्ये बसून विष प्राशन करुन या कुटुंबाने आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही मृतदेहांच पोस्टमार्टम करण्यात येईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विष प्राशन करुन आत्महत्या करणारं हे कुटुंब उत्तराखंडच असल्याच सांगितलं जातय. पंचकूलामध्ये हे कुटुंब रहायचं. मृतांमध्ये एक जोडपं, त्यांची तीन मुलं आणि कुटुंबातील वृद्धांचा समावेश आहे. ज्या कारमध्ये हे सर्व मृतदेह मिळाले, त्या कारचा नंबर डेहराडूनचा आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय.
हे कुटुंब उत्तराखंडच होतं. पंचकूला येथे 1204 घरासमोर कारमध्ये बसून या कुटुंबाने आयुष्य संपवलं. सोमवारी रात्री या घटनेबद्दल समजल्याच पोलिसांनी सांगितलं. रात्री 11 वाजता पोलिसांना एक फोन आला. कॉलरने सांगितलं की, एक कार पंचकूलाच्या सेक्टर-27 मध्ये उभी आहे. त्यात काही लोकांनी आत्महत्या केली आहे.
माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. मृतदेह कारमधून काढून पंचकूलाच्या सेक्टर 26 येथील एका खासगी रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले आहेत. सर्व मृतदेहांच पोस्टमार्टम होईल. कारमध्ये 7 जण होते. डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलय. रुग्णालयात आणण्याआधीच सर्वांनी प्राण सोडले होते. मृतकांची ओळख पटली आहे. देशराज मित्तल आणि प्रवीण मित्तल अशी त्यांची नाव आहेत.
तपासात पोलिसांना समजलं की, प्रवीणने अलीकडेच डेहराडून येथे टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस सुरु केला होता. त्याने बिझनेसमध्ये बराच पैसा टाकला होता. पण यश मिळालं नाही. बिझनेस लॉसमध्ये गेल्याने प्रवीण कर्जात बुडाला होता. कुटुंबाचा खर्च भागवणही दिवसेंदिवस त्याच्यासाठी कठीण झालं होतं. म्हणून संपूर्ण कुटुंबाने जीवन संपवलं.