साई चौकातील हुक्का पार्लरवर पिंपरी पोलिसांची कारवाई

551

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) -पिंपरी कॅम्प परिसरातील साई चौक परिसरात असलेल्या रौनक हॉटेल अॅंन्ड रेस्टॉरंट मध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पिंपरी पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी एक लाखांहून अधिक किमतीचा हुक्का फ्लेवर जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 25) मध्यरात्री साडेबारा वाजता करण्यात आली.

हॉटेल मालक विक्रम परशुराम बख्तीयारपुरी (वय 35, रा. वैभवनगर, पिंपरी), हॉटेल व्यवस्थापक संजय हमेलाल छेत्री (वय 29, रा. साई चौक, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अभिजित कुंभार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील साई चौकात असलेल्या रौनक हॉटेल अॅंन्ड रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री हुक्का पार्लरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये आरोपींनी हॉटेलमध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकांना मद्य व तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करून दिला. कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाख आठ हजार रुपये किमतीचा हुक्का फ्लेवर डब्बे आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.