सांगलीl आघाडीत बिघाडी, विशाल पाटील अपक्ष लढणार ?

0
155

दि १४एप्रिल (पीसीबी )- सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालतील निवडणूक कार्यालयातून घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील हे बंडखोरीच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे . येत्या देन दिवसात काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार त्यानंतर विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील विशाल पाटील अद्याप ठाम आहेत. काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत.त्याबाबत सध्या सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कॉग्रेस कार्यकर्ता आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका सूरु आहेत. तसेच आता विशाल पाटील यांच्या स्वीस सहाय्यकाने उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे. तसेच वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे. तर १६ तारखेला विशाल पाटील हे भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शनही करणार आहेत.