ससून आयसीयू मध्ये उंदिर चावल्याने पेशंटचा मृत्यू

0
28

दि 2 एप्रिल (पीसीबी )- पुण्यातील ससून रुग्णालय कायम या-ना त्या कारणाने चर्चेत असते. आता तर चक्क आयसीयूमधील रुग्णाला उंदीर चावल्याने त्याची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. १६ मार्च रोजी आयतीयूत दाखल झालेल्या रुग्णाचा २६ मार्च रोजी उंदराने चावा घेतला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यातील सागर रेणुसे या ३० वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. त्यानंतर या अपघातग्रस्त तरुणाला पुणे शहरातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. १६ मार्च रोजी ससूनमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
ICU मध्ये उपचार घेणाऱ्या या रुग्णाचा २६ मार्च रोजी उंदराने चावा घेतला. डोके, कान आणि इतर अवयवाना चावा घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्याला उंदीर चावल्याचं मान्य केलं. त्यानंतर रुग्णाची प्रकृती खालावली. अखेर रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.