समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होणार

0
84

मुंबई, दि. १० (पीसीबी) – समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या विरुद्ध ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट’ (PMLA Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर, ईडीने काही लोकांना समन्स देखील पाठवले आहेत, ज्यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करणार आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काही लोकांची चौकशीही केली आहे. ज्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, त्यापैकी काही एनसीबीशी संबंधित आहेत. याशिवाय काही खासगी लोकांचाही समावेश असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे. तपास यंत्रणेने या सर्वांना चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात बोलावले आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले.