संभाजीनगर मधून दुचाकी चोरीला

53

निगडी, दि. १ (पीसीबी) – संभाजीनगर चिंचवड येथील साई विरंगुळा केंद्र येथून अवघ्या दोन तासात दुचाकी चोरीला गेली. ही घटना बुधवारी (दि. 28) सायंकाळी घडली.

सुरेश पांडुरंग कस्तुरे (वय 62, रा. साने चौक चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजता संभाजीनगर येथील साई विरंगुळा केंद्र येथे गेले होते. त्यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी विरंगुळा केंद्राच्या बाहेर पार्क केली. रात्री पावणे नऊ वाजता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.