संत निरंकारी मिशनद्वारा विशाल स्वच्छता अभियान संपन्न…

0
383

पुणे,दि.२ (पीसीबी) -निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने रविवार, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी संपूर्ण भारतवर्षामध्ये विशाल ‘स्वच्छता अभियान’ भारतीय रेल्वे आणि अन्य शासकीय ठिकाणांच्या प्रशासनाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा करण्यात आले. पुणे झोन मध्ये ससून रुग्णालय आणि बी.जे. शासकीय मेडिकल कॉलेज परिसरामध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्वछता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये मिशनचे सर्व संयोजक,मुखी,सेवादल अधिकारी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक आणि निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने सम्मिलीत होऊन मोठ्या प्रमाणात रुग्णालय परिसराची साफसफाई केली. ससून रुग्णालय त्याचबरोबर पुणे महानगरपालिका प्रशासनाचे देखील मोलाचे योगदान हे अभियान संपन्न होण्यासाठी लाभले. संपूर्ण भारत देशात ५० हुन अधिक शहर आणि नगरांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.

संत निरंकारी मिशन सन २०१५ पासून ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ एक अभिन्न अंग राहिले असून मिशनला भारत सरकारने ‘स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अम्बॅसेडर’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त जनकल्याणार्थ मिशनद्वारा वेळोवेळी स्वास्थ्य आणि चिकित्सा संबंधित सुविधा ,स्वच्छ पेयजल ची व्यवस्था ,शैक्षणिक स्तरावर अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी विद्यालयांची देखरेख ,महिला सशक्तीकरणाला अधिक मजबुती देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र ज्यामध्ये मुख्यतः शिलाई आणि कढाई केंद्र व्यापक प्रमाणात चालविण्यात येत आहेत ज्यायोगे महिला आत्मनिर्भर बनतील आणि एक सुंदर समाजाची निर्मिती होईल.

या अभियानामध्ये गणमान्य व्यक्ती आणि मुख्य अतिथी डॉ. विजय जाधव (उपअधिक्षक ससून ), डॉ. सोमनाथ खेडेकर (ब्लड बँक अधिकारी ससून रुग्णालय), आदी मान्यवर सम्मिलीत होते. त्यांनी निरंकारी मिशनच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले कि मिशन सदैव मानव कल्याणार्थ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मिशनच्या माध्यमातून वेळोवेळा स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर याव्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम सुंदर पद्धतीने राबविले जातात. कोरोनाच्या विषम परिस्थितीमध्ये मिशनद्वारा ‘कोविड केअर सेंटर’ आणि लसीकरण शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले. या सर्व लोककल्याणाच्या सेवेचा आधार सद्गुरूंची अपार कृपा आणि दिव्य मार्गदर्शन राहिले आहे.पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच ससून रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले.