संजय राऊत यांच्या त्या आरोपांवर बावनकुळेंचे सडेतोड उत्तर

65

मकाऊ, दि. २० (पीसीबी) – खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीनमधील मकाऊ येथे असणाऱ्या कॅसिनोमधील एक फोटो शेअर केला आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले की, महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळत आहेत असा गंभीर आरोप करत फोटो झुम करून बघा हे तेच महाशय आहेत ना? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. तर एका रात्रीत त्यांनी 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले असा गंभीर आरोपही केला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचेही त्यांनी म्हटले.