श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये योग दिवस उत्साहात साजरा

38

पिंपरी दि.२३ (पीसीबी) –   श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा येथे जागतिक योग दिवसनिमित्त जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव बबनराव गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. यावेळी पहिली ते चौथीच्या मुलांना योगाचे महत्व आणि योगा करण्याचे फायदे या विषयांवर समर्थ स्कूलचे शिक्षक श्री. सुरज नरसिंग सोमवंशी सर यांनी माहिती दिली तसेच मुलांकडून विविध प्रकारचे योगासने व सूर्यनमस्कार करून घेतली. यावेळी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या सचिव सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांनी मुलांना निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे किती महत्व आहे याबदल माहिती दिली.

स्कूल अँड कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता टिळेकर यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनाक्षी पाटील मॅडम , निकिता हजेरी मॅडम , आम्रपाली शेळके मॅडम, बिजयलक्ष्मी साहो मॅडम , तृप्ती सातव मॅडम , सायली मालापुरे मॅडम , प्रिय शिंदे मॅडम , पल्लवी बोरसे मॅडम , नीलिमा घोरपडे मॅडम , दीक्षा वाडेकर , वासंती मॅडम , वैशाली दिघे मॅडम, योगिता अरुडे मॅडम , अस्मिता शिंदे मॅडम तसेच अजित थोरात सर , रत्नाकर वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले.