शेत जमिनीवर अतिक्रमण ; 16 जणांवर गुन्हा दाखल

56

कासारसाई, दि. २२ (पीसीबी) – जमीन हडपण्याच्या उद्देशाने शेत जमिनीवर बेकादेशीररित्या तारेचे कुंपन टाकले. याप्रकरणी 16 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 जुन ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत कासारसाई येथे घडला.

लक्ष्मण दशरथ थोरवे (वय 52, रा. कासारसाई, मुळशी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बैजनात कालिदास शर्मा, राजेंद्रकुमार हरिशंकर शुक्ला, रोहित अनिल शुक्ला, अमित उर्फ दिपक बैजनाथ शर्मा, दिपक अनिल शुक्ला, मयुर जयवंत शितोळे, लौकीक दत्तात्रय गायकवाड, अमित राजेंद्र शुक्ला, धिरज शुक्ला व इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कासारसाई परिसरात शेतजमीन आहे. त्यांची जमीन हडपण्याच्या उद्देशाने आरोपींनी रात्रीच्या वेळी शेतात अतिक्रमण करून तारेचे कुंपन टाकले. तसेच फिर्यादी यांना व त्यांच्या कुंटुंबातील महिलांना अश्लिल भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली. सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले तपास करीत आहेत.