शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

0
114

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची 22 लाख 15 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 19 फेब्रुवारी ते 24 एप्रिल या कालावधीत थेरगाव येथे घडला.

रवी तोमर (वय 28), करनवीर ढिल्लोन (वय 26), अभिजित ठाकूर (वय 27), निलमा चौहान (वय 28) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फेसबुकवर स्टॉक एक्स्प्लोअर नावाची जाहिरात दाखवून त्यावर एक लिंक पाठवून फिर्यादीस एका ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. तिथे शेअर मार्केट, स्टॉक, आयपीओ मध्ये मोठ्या प्रमाणात नफा होत असल्याचे भासवून एका लिंकद्वारे एक एप डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने एप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्याकडून गुंतवणुकीच्या बहाण्याने 22लाख 15 हजार रुपये घेत त्यांना कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

रावेत मध्ये पावणे नऊ लाखांचा गंडा

अशाच प्रकारे मोबाईल एप डाउनलोड करण्यास सांगत त्या माध्यमातून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत एका व्यक्तीकडून आठ अलख 74 हजार रुपये घेतले. दरम्यान त्यांना दोन महिन्यात 500 डॉलर परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र पैसे घेतल्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सिद्धार्थ सुकुमार असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.