शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या पाहण्याने 18 लाखांची फसवणूक

0
50

वाकड, दि. १९ (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल असे सांगत एका महिलेची 18 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 25 जानेवारी ते 4 मार्च या कालावधीत भूमकर चौक वाकड येथे घडला.

याप्रकरणी 56 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनुराग ठाकूर, अक्षय तन्ना (मूळ नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सोबत सोशल मीडिया वरून संपर्क करून त्यांना एका व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतले. तिथे फिर्यादीस ट्रेड खरेदी करण्यास सांगून चांगला फायदा होईल असे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार फिर्यादी महिलेले तीन शेअर मध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करून घेतले. महिलेने आरोपींना वेगवेगळ्या शेअरसाठी एकूण 18 लाख 32 हजार 500 रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी महिलेची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.