शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय केला जाहीर !

24

मुंबई , दि. २२ (पीसीबी) : शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या मैदानावर मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे अर्ज शिवसेनेतील दोन गटांकडून दाखल करण्यात आले होते. मात्र कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महापालिकेने परवानगी नाकारली असली तरी शिवसेनेनं यासाठी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. दरवर्षीप्रमाणे दादरमधील शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे २२ ऑगस्टला अर्ज करूनही परवानगी मिळाली नसल्याने कोंडी झालेल्या शिवसेनेने अखेर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.पालिकेने एक महिना होऊनही परवानगी दिलेली नव्हती मात्र आता दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मध्ये होणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.