शिवराज नगर येथे दोन लाखांची घरफोडी

48

वाकड, दि. १९ (पीसीबी) – पत्नीसह मुलाला घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरात अवघ्या पावणे दोन तासात चोरट्यांनी डल्ला मारून दोन लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शिवराज नगर, रहाटणी येथे शनिवारी (दि. 17) सायंकाळी सहा ते पावणे आठ वाजताच्या कालावधीत घडली.

किरण विजयकुमार शिंदे (वय 36, रा. शिवराज नगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नीसह मुलाला घेण्यासाठी डांगे चौक येथे गेले होते. ते मुलाला घेऊन रात्री पावणे आठ वाजता परत आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. अवघ्या पावणे दोन तासात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.या हॉल मधील लाकडी कपाटातून दोन लाख 10 हजारांचे सोन्याचे दागिने, 1500 रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 11 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.