शिरगावमध्ये दारू भट्टीवर छापा

0
128

शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट पाचने छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 11) सायंकाळी पावणे सहा वाजता करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 21 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर दारूभट्टी सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. महिलेने तीन हजार लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी गुळ मिश्रित रसायन भिजत घातले होते. पोलिसांनी कारवाई मध्ये 63 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.