“शिंदे, पेशवे तुम्हाला धोत्रे धुण्यास व भांडी घासायला ठेवतील”- प्रा. हरी नरके

149

पिंपरी दि. १ (पीसीबी) -आपण इतिहासातून काही शिकत नाही. पेशव्यांचे एकनिष्ठ सरदार दत्ताजी शिंदे जेव्हा पेशव्यांच्या आदेशावरून टाकोटाक निघाले नी मल्हारराव होळकर यांच्याकडे गेले. “पेशव्यांचे दुश्मन रोहील्याला खतम करायचे आहे, त्वरित निघूया ” असे ते होळकरांना म्हणाले. त्यावर मुत्सद्दी होळकर म्हणाले, ” शिंदे, जोवर शत्रू जिवंत आहे, तोवर पेशव्यांना तुमची गरज आहे. रोहिले संपले की पेशवे तुम्हाला भांडी घासायला नी धोत्रे धुवायला ठेवतील.”

आज ४ गुजराती देश चालवीत आहेत. दोघे देश विकताहेत. दोघे खरेदी करताहेत. त्यांना मुंबई गुजरातला पळवायची आहे. किमान केंद्रशासित करायची आहे. त्यात सगळ्यात मोठा अडथळा उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा होता. त्यांना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करण्यात आला. पण उद्धव ठाकरे कमजोर झाले की एकनाथ शिंदे यांचे अवमूल्यन केले जाईल.

२०१४ ते १९ भाजप सेना युती होती, शिवसेनेचे ६३ आमदार होते नि तरीही अवघी ५ मंत्रीपदे दिली गेली होती. आता ३९ लोक बरोबर असतानाही शिंदे गटाला १३ मंत्रीपदे का? कारण त्यांचा उपयोग गुजरातसाठी करायचा आहे.

नाहीतरी १९६० पासून गुजराती घोषणा आहेच ना, “मुंबई तुमची, भांडी घासा आमची!”ते शिंदे लढवय्ये होते, युद्धात शहीद होतानाही ते म्हणाले होते, ” बचेंगे तो और लढेंगे.” ते ना गद्दार झाले होते ना शरण गेले होते. – प्रा.हरी नरके