शहीद भगतसिंग यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान प्रेरणादायी – उल्हास जगताप

0
285

पिंपरी दि. २८ (पीसीबी) – स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांच्या बलिदानाने आणि त्यागाने देशाला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान प्रेरणादायी आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणा-या स्वातंत्र्यसैनिक तसेच देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन भावी पिढीने त्यांच्या देशभक्तीचा आदर्श ठेवावा, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दापोडी चौकातील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, कामगार कल्याण अधिकारी.