शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

0
427

रावेत, दि. ११ (पीसीबी) -शस्त्र घेऊन दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 9 फेब्रुवारी रोजी रात्री म्हस्केवस्ती, रावेत येथे करण्यात आली.

विजय शंकर शर्मा (वय 19, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश तांबे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना म्हस्केवस्ती रावेत येथे एका दुचाकीवरून तिघेजण जात असताना आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे एक तलवार आणि एक कोयता अशी शस्त्रे मिळून आली. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.