शस्त्र बाळगणाऱ्या तरुणास अटक

258

चऱ्होली, दि. ८ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. ७) दुपारी भोसले वस्ती, च-होली बुद्रुक येथे करण्यात आली.

रोहन बाबासाहेब थोरे (वय २२, रा. भोसले वस्ती, च-होली बुद्रुक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाजी जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विनापरवाना बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता जवळ बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून ९० रुपये किमतीचा कोयता जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.