शस्त्राचा धाक दाखवून एक लाखांचा दरोडा

0
253
crime

पुणे, दि. २३ (पीसीबी) – पती पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून 97 हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री चऱ्होली खुर्द येथे घडली.

रमेश विठ्ठल थोरवे (वय 43, रा. चऱ्होली खुर्द) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 42/बीजे 5596 या कार मधून आलेल्या पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरवे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपलेले असताना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतून पाच अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी घराच्या दरवाजावर लाथ मारून कडी तोडून घरात प्रवेश केला. थोरवे आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यावर लोखंडी कोयता व विळ्याचा धाक दाखवून 97 हजार रुपये किमतीचे 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आरोपींनी दरोडा टाकून चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.